पहिल्याच दिवशी चार कोटी तिजोरीत
ठाणे, ता. २ : ठाणे महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत आयुक्त वारंवार नाराजी व्यक्त करत असतानाच नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मालमत्ता कर विभागाने चार कोटींची वसुली करत धडाकेबाज सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या आर्थिक वर्षात ‘शहर विकास’ विभागाने दिलेले उद्दिष्ट ओलांडून चांगली कामगिरी केली असली, तरी ‘पाणीपुरवठा’ विभागाने मात्र प्रशासनाची घोर निराशा केली आहे.
ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कर, पाणी आणि शहर विकास या तीन विभागांच्या कामगिरीचा आढावा घेतला असता, संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. ३१ मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर विभागाने ८७८ कोटी रुपयांची वसुली केली आहे.
शहर विकास विभागाने यंदा पुन्हा एकदा आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. शासनाकडून विविध शुल्कांमध्ये सवलती दिल्याने महसूल घटण्याची भीती व्यक्त केली जात होती; मात्र विकास शुल्क, वाढीव भू-निर्देशांक आणि छाननी शुल्काच्या माध्यमातून विभागाने स्थिर उत्पन्न राखले. या विभागाला ६५० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ६६२ कोटी ९१ लाख रुपयांची वसुली करून विभागाने उद्दिष्टापेक्षा १२ कोटी १० लाख रुपये अधिक जमा केले आहेत.
दुसरीकडे, पाणीपुरवठा विभागाची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे. या विभागाकडून केवळ १३७ कोटींची वसुली झाली असून, प्रशासनाच्या अपेक्षेपेक्षा हा आकडा खूपच कमी आहे. पाणीपट्टी वसुलीतील ही मरगळ दूर करणे आता प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.