

Kolhapur Accident Young Doctor Dies In Car Container Crash
Esakal
कुंडलिक पाटील, करवीर : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर कार आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात झालाय. या अपघातात २८ वर्षीय डॉक्टर तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात पन्हाळा तालुक्यातल्या मरळी इथं घडला. या अपघाताची नोंद कळे पोलिसात झाली आहे.