मुंबई

छत्रपती शिवरायांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विकसित भारताचे स्वप्न साकार करूया

CD

शिवरायांनी समाज जागरूक केला
रायगडावरील शिवपुण्यतिथी कार्यक्रमात त्रिवेदींचे प्रतिपादन
महाड, ता. २ (बातमीदार) : आपल्यामध्ये असलेल्या अतुलनीय शक्तीची जाणीव हिंदू समाज व भारतीय समाजाला नव्हती. अशा या समाजाला जागरूक करण्याचा श्रीगणेशा छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरून केला. छत्रपती शिवरायांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विकसित भारताचे स्वप्न साकार करूया, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी गुरुवारी रायगड किल्ल्यावरून केले.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे व स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची ३४६ वी शिवपुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, खासदार धैर्यशील पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, तसेच जिल्हा परिषद नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर आदी उपस्थित होते. सुधांशू त्रिवेदी पुढे म्हणाले, केवळ भारतातच नव्हे, तर जगाची मोठी ताकद असलेल्या मुघल साम्राज्याशी टक्कर देणारी ताकद या रायगडावरून पुढे आली. हेदेखील गौरवशाली असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री भरत गोगावले यांचेही या वेळी भाषण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: 'काही गोष्ट स्पष्ट करायच्यात, माझ्या दुखापतीबद्दल बोलणारे...' सूर्याने सांगितलं सत्य नेमकं काय? फॉर्मवरही भाष्य

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

रणवीर सिंह आता बॉलिवूडमध्ये काम करु शकणार नाही? ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंह अडचणीत, FWICE ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT