मुंबई

मेट्रो अपघातप्रकरणी तिघांना जामीन मंजूर

CD

मेट्रो अपघातप्रकरणी तिघांना जामीन मंजूर

मुंबई, ता. २ : मुलुंडमधील एलबीएस मार्गावर ‘वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो-४’ मार्गिकेच्या कामादरम्यान मेट्रोच्या खांबांवरील अडीच मेट्रिक टनाचा सिमेंटचा पॅरापेट कोसळून झालेल्या अपघाताप्रकरणी तीन प्रकल्प अधिकाऱ्यांना सत्र न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला.
हा अपघात वेल्डरच्या चुकीमुळे झाल्याचे निरीक्षणही अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. बी. ओझा यांनी राजवी-मिलन इन्फ्राचे हरीश चौहान (प्रकल्प संचालक), कुलदीप सपकाळ (प्रकल्प व्यवस्थापक) डीबी-हिल-एलर्टजी संयुक्त उपक्रमाचे अवधूत इनामदार (प्रकल्प व्यवस्थापक)  या तिघांना जामीन मंजूर करताना प्रामुख्याने नोंदवले. हे तिघेही महिनाभरापासून कारागृहात आहेत. त्यांची पोलिस कोठडीतील चौकशी पूर्ण झाली आहे. तसेच या घटनेचा लेखापरीक्षण अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे, असेदेखील न्यायालयाने  न्यायालयाने नमूद केले. तसेच घटना ही कोणत्याही संरचनात्मक दोषाचा किंवा हेतुपुरस्सर कृतीचा परिणाम नसून, ती केवळ अंमलबजावणी स्तरावरील एका त्रुटीमुळे घडल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडताना ॲड. सुवर्णा आव्हाड वास्त यांनी केलेला युक्तिवादही न्यायालयाने ग्राह्य धरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT