स्नेहल नुनीस यांना पुरस्कार
विरार (बातमीदार) ः वसईतील बंडामपूर येथील रहिवासी स्नेहल नुनीस यांना एपीजे अब्दुल कलाम भारत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करताना मॉडेलिंगच्या क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.