उद्योगांच्या प्रश्नावर महापौरांंशी चर्चा
विरार (बातमीदार) ः वसई-विरारमधील २० उद्योजकांची विशेष बैठक महापालिकेत झाली. या वेळी उद्योजकांनी आपल्या विविध प्रश्नांबाबत महापौर अजीव पाटील यांची भेट घेतली. बैठकीदरम्यान महापौरांनी सर्व उद्योजकांचे प्रश्न, व्यावसायिक गरजा ऐकून घेतल्या. तसेच संबंधित विभागांशी थेट संपर्क साधून मार्गदर्शनही केले.