मुंबई

जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

CD

खारघर, ता. ३ (बातमीदार) : सेक्टर १२ मध्ये जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेल्याची घटना गुरुवारी (ता. २) रात्री घडली. परिसरातील रस्त्यावर अचानक पाण्याचा मोठा प्रवाह वाहू लागल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

खारघरच्या सेक्टर १२ मधील अशोक इमारत आणि वासुदेव बळवंत फडके उद्यानाशेजारील रस्त्यावर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर साचले होते. अनेक वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागला. तसेच काही ठिकाणी पाण्यामुळे चिखल निर्माण झाल्याने पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागला. रस्त्यावर केल्या जाणाऱ्या खोदकामामुळे जलवाहिनी फुटली असावी, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची माहिती नागरिकांनी नगरसेविका लीना गरड दिल्यावर त्यांनी तत्काळ सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र, दुरुस्तीला उशीर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

French Open 2026: २५ व्या ग्रँडस्लॅमसाठी नोवाक जोकोविचचा महासंघर्ष! २ तास ५१ मिनिटांच्या थरारात कसाबसा मिळवला विजय!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २६ मे २०२६

ढिंग टांग : मार्को रुबियो रिपोर्ट..!

जीवनमान-जीवनभान : संजीवनी देणारी ‘सीपीआर’ पद्धत

RCB vs GT Qualifier 1: RCB सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये जाणार? गुजरात टायटन्सशी आज ‘क्वालिफायर वन’ लढत धरमशालामध्ये रंगणार

SCROLL FOR NEXT