मुंबई

जिल्ह्यात ६४ एकल महिला

CD

पालघर, ता. ३ (बातमीदार) : पालघर जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील एकल महिलांचे अंगणवाडीसेविकांद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. यात जिल्ह्यात ६४ हजार ७७९ एकल महिलांची नोंद झाली आहे. या महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरू करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, एकूण नोंदणीकृत महिलांमध्ये ५४ हजार २५० विधवा, एक हजार ३११ घटस्फोटित, एक हजार ७७३ परित्यक्त; तसेच सात हजार ३४५ अधिक वयाच्या अविवाहित महिलांचा समावेश आहे. नागरी भागातील सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ही संख्या दोन लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.
तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, डहाणू, कासा, वाडा, पालघर, मनोर आणि वसई या भागांत एकल महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन विविध योजनांद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. महिला व बालविकास विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार, सर्वेक्षणातील आकडेवारीचे वयोगटानुसार विश्लेषण करून तालुकास्तरावर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीत एकल महिलांची यादी तयार करून आवश्यक कागदपत्रांची नोंद ‘गूगल शीट’मध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बालसंगोपनासाठी अनुदान
जिल्ह्यातील दहा हजार एकल महिलांच्या अल्पवयीन मुलांपैकी केवळ दीड हजार विद्यार्थ्यांना बाल संगोपन योजनेचा लाभ मिळत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उर्वरित पात्र लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट करण्यासाठी शाळांच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक बालकाला १८ वर्षांपर्यंत दरमहा २,२५० रुपये अनुदान दिले जाते.

बचत गटाबाहेरील महिलांना गटात समाविष्ट करून ‘उमेद’ व ‘मावी’च्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कर्जावरील व्याज सहाय्य, आरोग्य तपासणी शिबिरे, तसेच पुनर्विवाह करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी शैक्षणिक ठेव यांसारख्या उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत. एकल महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
- मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

एकल महिलांची प्रकल्पनिहाय आकडेवारी
तलासरी : ६७२३
जव्हार १ : २४१५
जव्हार २ :२१९९
मोखाडा : ३९७६
विक्रमगड :६२६९
डहाणू : १००९३
कासा : ६५६७
वाडा १ : २४०८
वाडा २ : २०५९
पालघर : ११३८२
मनोर : ७७४३
वसई : २९४५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT