मुंबई

आरटीई प्रवेश जिल्ह्यात २५ हजारांहून अधिक अर्ज

CD

आरटीई प्रवेशासाठी २५ हजारांहून अधिक अर्ज
ठाणे, ता. ३ : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी ठाणे जिल्ह्यात यंदा २५ हजार ५३ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे. यामध्ये ठाणे महापालिका हद्दीतून पाच हजार ४७० अर्ज प्राप्त झाले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आरटीई प्रवेश प्रक्रिया १७ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च होती. या कालावधीत एकूण ११ हजार ७५४ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. पालकांना अर्ज करण्यासाठी तीन वेळा मुदतवाढही देण्यात आली होती. यंदा सुरुवातीला शाळा निवडताना एक किलोमीटर अंतराची अट लागू करण्यात आली होती. या अटीमुळे अनेक पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि अर्जांचा वेग मंदावला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर याचा अधिक परिणाम झाला. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही अट शिथिल करण्यात आल्यानंतर अर्जांचा ओघ पुन्हा वाढल्याचे दिसून आले.
…………………….
ग्रामीण भागातून मर्यादित प्रतिसाद
अट शिथिल केल्यानंतरही ग्रामीण भागातील प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कमीच राहिला. कल्याण, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ आणि भिवंडी तालुक्यांतून एकूण आठ हजार १९४ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये अंबरनाथ तालुक्यातून सर्वाधिक अर्ज आले असून, मुरबाड तालुक्यातून केवळ २१५ अर्ज दाखल झाले आहेत.
………………………
महापालिका क्षेत्रनिहाय अर्जांची संख्या :
ठाणे – ५,४७०
नवी मुंबई – ५,३२६
कल्याण-डोंबिवली – ३,०९१
भिवंडी – १,७४१
उल्हासनगर – ६६९
मिरा-भाईंदर – ५६२
.....................
तालुकानिहाय अर्जांची संख्या :
कल्याण – २,६००
अंबरनाथ – २,८८२
भिवंडी – १,४७३
शहापूर – १,०२४
मुरबाड – २१५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT