रोहा शहरातून धोकादायक धातू कॉइल वाहतुकीवर बंदीची मागणी
परवानगीशिवाय सुरू असलेल्या अवजड ट्रेलरमुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका
रोहा, ता. ५ (बातमीदार) : रोहा रेल्वे स्थानक यार्डातून विले-भागाड येथील पास्को कंपनीकडे मातेश्वरी ट्रान्सपोर्टमार्फत धातू कॉइल्सची अवजड वाहतूक गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. ही वाहतूक शहराच्या मुख्य मार्गावरून होत असून, त्यासाठी नगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या अष्टमी येथील रोहिदास नगर व बायपास मार्गावरून ही धोकादायक वाहतूक सर्रास सुरू असून, त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर नगराध्यक्षा वनश्री शेडगे व मुख्याधिकारी अजय कुमार एडके यांनी पोलिस उपअधीक्षकांकडे लेखी निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. मात्र, महिनाभर उलटूनही कोणतेही निर्बंध लावले गेले नसून अवजड ट्रेलरची वाहतूक वाढतच असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
फोटो कॅप्शन : रोहे शहरातून अवजड व धोकादायक कोइल्सची वाहतूक करणारा ट्रेलर छायाचित्रात दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.