मुंबई

दोन मेट्रो मार्गिकांसाठी १४ हजार कोटींचे कर्ज

CD

दोन मेट्रो मार्गिकांसाठी
१४ हजार कोटींचे कर्ज

एमएमआरडीएने मागवल्या निविदा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मेट्रो-१० गायमुख-शिवाजी चौक मिरा रोड आणि मेट्रो-१२ कल्याण-तळोजा या दोन मेट्रो मार्गिका उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी तब्बल १४ हजार १०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची ‘एमएमआरडीए’ने तयारी सुरू केली आहे. या दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी वेगवेगळ्या वित्तीय संस्थांकडून एमएमआरडीएने स्वारस्य निविदा मागवल्या आहेत.
लोकल ट्रेनवरील गर्दीचा भार कमी करण्याबरोबरच वाहतूक रस्ते मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीए सुमारे ३५० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारत आहे. गायमुख-मिरा रोडदरम्यान सुमारे ९.२ किलोमीटर लांबीचा आणि कल्याण-तळोज्यादरम्यान सुमारे २३ किलोमीटरचा उन्नत मेट्रो मार्ग उभारला जाणार आहे.
त्यासाठी सुमारे १४ हजार १०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले जाणार असून कमी व्याजदराने कर्ज मिळावे म्हणून एमएमआरडीएने इच्छुक वित्तीय संस्थांकडून निविदा मागवल्या आहेत. त्यानुसार १० एप्रिलला प्री-बिड मिटिंग होणार आहे, तर २२ एप्रिलपर्यंत अंतिम निविदा भरता येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

SCROLL FOR NEXT