पोस्को उपक्रमांतर्गत महिला उद्योजकतेला नवी दिशा
स्थानिक महिला उद्योजकांना बाजारपेठ; ३५ स्टॉल्समध्ये विविध उत्पादनांचे सादरीकरण
माणगाव, ता. ५ (वार्ताहर) : औद्योगिक प्रगतीसोबत सामाजिक बांधिलकी जपत पोस्को महाराष्ट्र स्टीलतर्फे महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत कुणबी भवन सभागृहात स्थानिक महिला उद्योजक व शेतकरी उत्पादकांसाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात ३५ स्टॉल्स उभारण्यात आले असून, घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकला, कृषी उत्पादने आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सादरीकरण व विक्री करण्यात आली. सुमारे ८० हून अधिक उत्पादकांनी यात सहभाग नोंदवला.
या उपक्रमाला जी युन पार्क, महेंद्र तट्टे, विशाल शेंडे तसेच सीएसआर समूहाची उपस्थिती लाभली. मान्यवरांनी महिलांच्या उत्पादनांचे कौतुक करीत त्यांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन दिले. हे प्रदर्शन केवळ विक्रीपुरते मर्यादित न राहता महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणारे ठरले.
या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना बाजारपेठ मिळून स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ निर्माण झाले. तसेच उत्पादनांची गुणवत्ता, विविधता आणि विपणन कौशल्य वाढविण्यासही मदत झाली.
चौकट
कौशल्यांसाठी प्रभावी व्यासपीठ
या प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्यांना बाजारपेठ उपलब्ध झाली आणि त्यामुळे स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ मिळाले आहे. तसेच उत्पादनांमध्ये विविधता, गुणवत्ता सुधारणा आणि विपणन कौशल्य वाढविण्याच्या दृष्टीनेदेखील हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.