मुंबई

आंबेडकर पुतळा प्रकरणी खासदारांना ७ दिवसांचा अल्टिमेटम

CD

स्मशानभूमीतील डॉ. आंबेडकर पुतळ्यावरून वाद
काँग्रेसची खासदार श्रीकांत शिंदेंना स्पष्टीकरणासाठी सात दिवसांची मुदत
उल्हासनगर ता. ५ (वार्ताहर) : शांतीनगर स्मशानभूमीत उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरून उल्हासनगरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना खुले पत्र लिहून प्रश्नांचा भडिमार केला असून, या प्रकरणावर सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, शिवसेनेनेही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ मधील स्मशानभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या कोनशिलेवर महानगरपालिका, खासदार श्रीकांत शिंदे आणि स्थानिक नगरसेवकांची नावे आहेत. मात्र, पुतळा उभारणीच्या प्रक्रियेवर काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे.

धनंजय शिंदे यांनी शासनाच्या २०१७ च्या पुतळा धोरणानुसार स्मशानभूमीत पुतळा उभारण्यास परवानगी आहे का, जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आणि पोलिस प्रशासनाचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ घेण्यात आले होते का, पुतळ्यासाठी खर्च झालेला निधी कोठून आला, महापालिका आणि नागरिकांच्या वर्गणीबाबत विसंगत माहिती का दिली जात आहे, असे सवाल उपस्थित केले होते. या वादानंतर शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे यांनी बाजू मांडली आहे. त्यांनी सांगितले की, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतःहून महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. स्मशानभूमीतील हा पुतळा अत्यंत सन्मानपूर्वक हटवून त्याचे योग्य आणि अधिकृत ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी खासदारांनी प्रशासनाकडे केली आहे.

प्रशासकीय कोंडी
सुरुवातीला महापालिकेने या कामाशी संबंध नसल्याचे म्हटले होते, तर नंतर लोकवर्गणीतून काम झाल्याचे सांगितले गेले. आता लोकप्रतिनिधींच्या नावामुळे हा वाद न्यायालयीन आणि प्रशासकीय कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. शहरात सामाजिक संवेदनशीलता पाहता पोलिस आणि प्रशासन यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हा महापुरुषांच्या सन्मानाचा प्रश्न असून, बेकायदेशीर उभारणीत लोकप्रतिनिधींचा सहभाग असल्याचा संशय येतो. सात दिवसांत उत्तरे न मिळाल्यास काँग्रेस आक्रमक भूमिका घेईल.
- धनंजय शिंदे, प्रदेश सरचिटणीस, काँग्रेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT