मुंबई

लघु खनिजांची अवैध वाहतूक करणारा ट्रक अडवला

CD

भिवंडीत वाळू माफियांवर कारवाईचा बडगा
महसूल विभागाकडून १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

भिवंडी, ता. ५ : ग्रामीण भागात सुरू असलेल्या लघु खनिजांच्या अवैध वाहतुकीविरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. कोपर परिसरात वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला असून, १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

भिवंडीचे तहसीलदार अभिजित खोले यांना काल्हेर, कशेळी आणि कोपर परिसरातून वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी कडक कारवाईचे आदेश दिले होते. १ एप्रिलला महसूल अधिकारी रमेश सूर्यवंशी, मनोज नवले, रूपेश कारभारी आणि किसान हम्बीर यांचे पथक कोपर गावातील दोस्ती ग्रेटर ठाणे परिसरात गस्त घालत होते.

ट्रक अडवला
केवणी गावाच्या मुख्य रस्त्याकडे जात असलेला वाळूने भरलेला ट्रक (एमएच ४६ सीयू ९३७२) पथकाने अडवला. पथकाने वाळूच्या वाहतुकीचे परवाने मागितले असता, चालकाने अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. इतकेच नव्हे तर सरकारी कामात अडथळा आणत ट्रकच्या चाव्या हिसकावून तो घटनास्थळावरून पळून गेला. पळून गेलेल्या चालकाविरोधात आणि ट्रक मालकाविरोधात नारपोली पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वाळूसह ट्रक असा एकूण १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT