मुंबई

खोपिवलीत रंगला पारंपरिक कुस्ती आखाडा

CD

खोपिवलीत रंगला पारंपरिक कुस्ती आखाडा
१५० वर्षांची परंपरा कायम
टोकावडे, ता. ५ (बातमीदार) : आधुनिक काळात पारंपरिक खेळांचा विसर पडत चालला असताना, मुरबाड तालुक्यातील खोपिवली गावाने आपली दीडशे वर्षांची कुस्तीची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात जपली. हनुमान जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कुस्ती आखाड्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मल्लांनी आपले बाहुबळ आजमावले.

गोरख-मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी वसलेल्या या गावात कुस्ती हा केवळ खेळ नसून तो लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या आखाड्यात ठाणे, नाशिक, सातारा, सांगली, रायगड आणि पुणे या जिल्ह्यांसह राज्याबाहेरील नामांकित मल्लांनी हजेरी लावली होती. यंदाच्या स्पर्धेत पारंपरिक बक्षिसांसोबतच आधुनिक बक्षिसांचीही भर घालण्यात आली होती. रूपेश खाटेघरे यांच्या वतीने प्रथम पारितोषिकासाठी इलेक्ट्रिक दुचाकी देण्यात येणार आहे, तर काळुराम भांडे यांच्या वतीने द्वितीय पारितोषिक फ्रिज देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेसाठी चांदीची गदा, मानचिन्ह (ढाल) आणि पाच हजारांपासून २५ हजार रुपयांपर्यंतची रोख रक्कम देण्यात येणार आहे.

सांस्कृतिक उत्सव
केवळ कुस्तीच नव्हे, तर हनुमान जन्मोत्सवानिमित्त गावात भक्तीचा जागरही पाहायला मिळाला. ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात श्रीज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, कीर्तन आणि जागर भजनाचे कार्यक्रम संपन्न झाले. ग्रामीण भागात पारंपरिक खेळ मागे पडत असताना, खोपिवली गावाने गेल्या दीडशे वर्षांपासून हा वारसा टिकवून ठेवला आहे. या मातीने अनेक पैलवान दिले असून, ही ओळख जपण्यासाठी ग्रामस्थ एकजुटीने प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘समर्थ’ची भरारी; सर्व १४ जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी

बापरे, ही भेंडी आहे की सोनं? अमेरिकेत ७,२०० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या भेंडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

Latest Marathi News Live Update : पोलीस स्टेशनच्या अगदी दारातून सायकल चोरीला

Raksha Khadse News: वादळाचा कहर! केळीच्या बागा उद्धवस्त! खडसे शेतात गेल्या अन्..

Kannad News : भोकनगावात २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन संपविले जीवन; चिमुकलीच्या रडण्यामुळे घटना आली उघडकीस

SCROLL FOR NEXT