मुंबई

महामार्गवर तसेच घाट मार्गवर तिसऱ्या डोळ्याची आवश्यकता

CD

घाट मार्गावर तिसऱ्या डोळ्याची आवश्यकता
महाड-पोलादपूरच्या घाटांमध्ये मृतदेह आढळण्याचे सत्र; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पोलादपूर, ता. ५ (बातमीदार) ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या आंबेनळी, कशेडी आणि वरंध घाटांमध्ये मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे प्रकार वाढले आहेत. शनिवारी (ता. ४) वरंध घाटात एका युवकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर दुर्गम घाटमार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.
पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाट, कशेडी घाट आणि डोंगरदऱ्यांतील भागांमध्ये स्त्री-पुरुषांची हत्या करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. यामुळे आसपासच्या गावांमध्ये तसेच महामार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून, दिवसरात्र गस्तीपथक आणि सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत करण्याची मागणी पोलादपूरवासीयांडून करण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात वाहतूक वाढली असून, अपघाताची शक्यता वाढीस लागली आहे. सद्यःस्थितीत अपघाताचे प्रमाण कमी असले तरी भविष्याचा वेध घेत अपघात रोखण्यासाठी आतापासून उपाययोजना राबविणे क्रमप्राप्त बनले आहे. सुट्टीचा हंगाम व आगामी पर्यटन हंगाम लक्षात घेता या घाटमार्गावर चेक पोस्टसह सीसीटीव्ही यंत्रणेची गज व्यक्त केली जात आहे.

दुर्गम भागाचा गुन्हेगारांना फायदा
१ मागील वर्षी एप्रिल २०२५ मध्ये पोलादपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेने तिच्या साथीदारासह चालत्या कारमधून एका व्यक्तीचा ओढणीने गळा आवळून त्याचे प्रेत कशेडी घाटातील सिमेंट काँक्रीटच्या भिंतीलगत फेकून पलायन केले होते.
२ मागील महिन्यात आंबेनळी घाटात जळलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडल्याने या घटनेचा तपास सुरू आहे.
३ म्हाप्रल-पंढरपूर मार्गावरील वरंध घाट परिसरात शनिवारी (ता. ४) युवकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या तिन्ही घाटमाथ्यावर तिसऱ्या डोळ्यांची आवश्यकता व रात्रीची ग्रस्त वाढविणे गरजेचे बनले आहे. या घटनेचा शोध सुरू घेण्यासाठी पोलिस यंत्रणा तपासकामी लागली आहे.

घाटामध्ये होणाऱ्या घटना थांबवण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात येणार असून, पोलिस प्रशासनाकडून पोलिसांची गस्तदेखील वाढवण्यात आली आहे व घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनांवर लक्ष राहणार आहे.
- आनंद रावडे, पोलिस निरीक्षक, पोलादपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन

Kolhapur VIP Service: कोल्हापूरसह परराज्यातील तरुणींकडून व्हिआयपी सर्व्हिस, म्हैसाळमधील आलिशान बारवर छापा; नशेत धुंद तरुणांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT