तुर्भे, ता. ५ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारामध्ये गाळ्याव्यतिरिक्त लगतच्या पॅसेजमध्ये विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मार्चमधील कारवाईमध्ये सुमारे दोन लाख रुपये दंडात्मक रकमेची वसुली करण्यात आली आहे.
फळ बाजारामध्ये गाळ्यांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी फळांची विक्री करणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. परिणामी, पॅसेज किंवा गाळ्यासमोरील जागेतून नीट चालायलाही जागा नसते. त्यामुळे ग्राहक, माथाडी कामगार तसेच अन्य घटकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. याची नोंद घेत बाजार समितीचे सचिव शरद जरे यांनी धडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार काही महिन्यांपासून धडक मोहीम राबवून बाजारामध्ये शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. उपसचिव राजेंद्र कोंडे आणि मुख्य सुरक्षा अधिकारी चक्रधर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा अधिकारी संजय तळेकर यांच्या पथकाकडून ही मोहीम राबवली जात आहे. या कारवाईमध्ये गाळ्यांच्या बाहेर सामासिक जागा, तसेच धक्क्यावर ट्रक, टेम्पोमध्ये मालाची विक्री करू नये, यासंदर्भात वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. याला दाद न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आणि पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक व्यापारी विनापरवाना मालाची विक्री करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित गाळा मालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.