मुंबई

गटारांतून ऍसिडयुक्त सांडपाणी

CD

आम्लयुक्त सांडपाण्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास

बोईसर, ता. ५ (वार्ताहर) : तारापूर एमआयडीसी परिसरात पर्यावरणीय नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पावसाच्या पाण्यासाठी असलेल्या गटारांचा वापर करून काही उद्योगांकडून थेट आम्लयुक्त सांडपाणी सोडले जात असल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
नियमांनुसार केवळ पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी असलेल्या या गटारांत रसायनयुक्त सांडपाणी सोडणे हे गंभीर उल्लंघन ठरत असून, उद्योगांकडून उघडपणे पर्यावरणाशी खेळ केला जात असल्याचे चित्र समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्जे यांनी लिटमस पेपर चाचणीद्वारे गटारातील पाणी आम्लयुक्त असल्याचे निदर्शनास आणून दिले असून, या प्रकरणाची भीषणता अधोरेखित केली आहे.
या प्रकारामुळे जमिनीची सुपीकता, भूजल स्रोत आणि स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. तरीही संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, नियम मोडणाऱ्या उद्योगांवर तत्काळ कठोर कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

घराचा ताबा द्या, अन्यथा आत्महत्या करू, गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांचा इशारा; कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप

SCROLL FOR NEXT