मुंबई

प्रीमियर

CD

‘रुबाब’चा डिजिटल धमाका!
यंदा वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेला ‘रुबाब’ हा मराठी चित्रपट प्रेमात येणाऱ्या अहंकाराची वेगळीच बाजू दाखवून गेला. संभाजी ससाणे, शीतल पाटील, विशाल शिरतोडे, अभिजित साकते आणि सिमरन खेडकर यांच्या प्रभावी अभिनयासोबत दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी साकारलेली कथा प्रेक्षकांना भावली. ग्रामीण भागातल्या कथेत सूरज आणि वैशाली यांच्या नात्यातील प्रेम, अहंकार आणि आत्मसन्मान यांचा संघर्ष चित्रपटात ठळकपणे दिसून आला. प्रणय, ॲक्शन आणि भावनिक क्षणांची सांगड घालत ‘रुबाब’ने चित्रपटगृहात चांगला प्रतिसाद मिळविला. आता हा चित्रपट लवकरच झी ५ वर प्रदर्शित होणार असून, यामुळे तो अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. संभाजी यांनी सूरजची भूमिका साकारली आहे. शीतल पाटीलने वैशालीसारखी ठाम व्यक्तिरेखा साकारण्याचा अनुभव खास असल्याचे म्हटले. या कलाकारांबरोबरच विशाल शिरतोडे, अभिजित साकते आणि सिमरन खेडकर या कलाकारांनीही काम केले आहे. दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. झी ५च्या बिझनेस हेड हेमा व्ही. आर यांनी ही नात्याची खरोखरच एक हृदयस्पर्शी कथा असल्याचे सांगितले.
--------
सावनी रवींद्रचा ‘मुजरा शिवबाला’
मराठी संगीतविश्वात आपल्या मधुर आणि भावस्पर्शी आवाजाने ओळख निर्माण करणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र आता नव्या भूमिकेत समोर आली आहे. आता सावनीने ‘सावनी रेकॉर्डझ्’ या नावाने नवे म्युझिक लेबल सुरू केले आहे. या उपक्रमाचे उद्‍घाटन प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला अवधूत गुप्ते, अभिजित सावंत, कौशल इनामदार, नंदेश उमप यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती. या नव्या टप्प्याबाबत सावनी म्हणाली, “हे व्यासपीठ माझे स्वप्न असून, दर्जेदार आणि अर्थपूर्ण संगीत साकारण्याचा माझा प्रयत्न असेल. नवोदित कलाकारांनाही संधी देत संगीत क्षेत्रात काहीतरी वेगळं घडवण्याचा माझा निर्धार आहे.” या व्यासपीठाअंतर्गत सावनीचे पहिले गाणे ‘मुजरा शिवबाला’ रसिकांच्या भेटीला आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करणाऱ्या या गाण्याला वैभव देशमुख यांचे शब्द आणि विजय नारायण गवंडे यांचे संगीत लाभले आहे.
-------
‘सालबर्डी’मध्ये दिग्गज कलाकार!
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवीन विषयांवरील चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे. अशातच आता एका रहस्यमय कथेवर आधारित ‘सालबर्डी’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या १७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यामध्ये मराठीतील अनेक अनुभवी आणि लोकप्रिय कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार आहे. ‘सालबर्डी’ चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ मुख्य भूमिकाच नव्हे, तर इतर भूमिकांसाठीही नामवंत कलाकारांची निवड करण्यात आली आहे. पूजा सावंत, शशांक शेंडे आणि ओंकार भोजने हे प्रमुख भूमिकेत असून, त्यांच्यासोबत भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर आणि प्रवीण डाळिंबकर यांसारख्या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अशा प्रकारे अनेक नावाजलेल्या कलाकारांना एकत्र घेऊन चित्रपट करण्याकडे निर्मात्यांचा कल वाढताना दिसत आहे. चित्रपटाचे कथानक एका छोट्या गावाभोवती फिरणारे आहे. या गावात घडणाऱ्या काही अनाकलनीय घटना आणि त्यातून निर्माण होणारी भीती, यावर चित्रपटाची कथा आधारलेली आहे. या घटनांमागचे वास्तव काय आहे, याचा शोध या चित्रपटातून घेतला जाणार असल्याचे समजते. दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, ‘नेब्यूला फिल्म्स’ या बॅनरखाली अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करेल का, हे लवकरच स्पष्ट होईल.
.......
अनुप जलोटा यांच्या साथीला बांगलादेशी स्वर!
भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गझल गायक आणि भजन सम्राट अनुप जलोटा पुन्हा एकदा एका विशेष सांगीतिक प्रयोगामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या वेळी त्यांच्या सुरांना साथ लाभली आहे ती बांगलादेशातील प्रसिद्ध गायिका शिथी साहा यांची. नुकतंच अनुप जलोटा यांच्या मुंबईतील निवासस्थानी या दोन्ही कलाकारांच्या एका सुमधुर गझलचे चित्रीकरण अत्यंत दिमाखात पार पडले. शिथी साहा हे बांगलादेशातील एक प्रसिद्ध नाव असून, तिच्या आवाजातील वेगळेपणा आणि भावूक सादरीकरण यामुळे ही गझल अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. या सहकार्यामुळे दोन देशांमधील सांस्कृतिक संबंधांना सुरांच्या माध्यमातून नवी दिशा मिळणार असल्याचे दिसून येत आहे. ही आगामी गझल प्रेम, विरह आणि काव्यात्मक अभिव्यक्तीवर आधारित आहे. अनुप जलोटा यांनी या प्रकल्पाबद्दल सांगितले की, ‘‘अशा प्रकारच्या दर्जेदार कामामुळे गझलची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यास मदत होते.’’ ही गझल लवकरच विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून, जगभरातील संगीतप्रेमींना या क्रॉस-बॉर्डर सादरीकरणाची प्रतीक्षा लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT