महापालिकेची पाणीपट्टी वसुली १२७ कोटींवर
ऑनलाइन सुविधेकडे मात्र नागरिकांची पाठ
ठाणे, ता. ५ : ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात पाणीपट्टी वसुलीत गेल्या काही वर्षांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे; मात्र डिजिटल युगातही पालिकेच्या ‘ऑनलाइन’ बिल भरणा सुविधेला नागरिकांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. एकूण वसुलीपैकी केवळ आठ टक्के रक्कम ऑनलाइन माध्यमातून जमा झाल्याचे समोर आले आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली १ एप्रिल २०२५ पासून राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे पाणीपट्टी वसुली १३७ कोटी ९७ लाखांवर पोहोचली असली, तरी २५० कोटींचे वार्षिक उद्दिष्ट गाठणे अद्याप बाकी असून, यामध्ये सर्वाधिक १९ कोटी ३२ लाखांची वसुली नौपाडा प्रभाग समितीने केली आहे, तर वागळे प्रभाग समितीत सर्वात कमी म्हणजे सात कोटी ४६ लाखांची वसुली झाली आहे.
महापालिकेकडून दर तीन महिन्यांनी पाणीबिले पाठवली जातात आणि नागरिकांना मोबाईल संदेशाद्वारेही सूचित केले जाते. तरीही केवळ आठ टक्के नागरिकांनीच ऑनलाइन सुविधेचा वापर केला आहे. बहुतांश नागरिक अजूनही प्रभाग कार्यालयांत जाऊन किंवा रांगेत उभे राहून बिल भरण्याला पसंती देत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
थकबाकीदारांवर ‘हातोडा’
जकात आणि एलबीटी बंद झाल्यानंतर पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी हाच आहे. त्यामुळे २५० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासन आता आक्रमक झाले आहे. येत्या काळात मोठ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याची तयारी पाणीपुरवठा विभागाने सुरू केली आहे.
कारवाईचा इशारा
आम्ही नागरिकांना डिजिटल प्लॅटफॉर्म वापरण्याचे आवाहन करत आहोत, जेणेकरून त्यांचा वेळ वाचेल. मात्र, अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. आगामी काळात वसुलीची टक्केवारी वाढवण्यासाठी थकबाकीदारांविरुद्ध विशेष मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.