मुंबई

संघटन सृजन अभियानात काँग्रेस कार्यकर्त्यांशी थेट संवाद

CD

संघटन सृजन अभियानात काँग्रेस कार्यकर्त्यांशी थेट संवाद
मुरूड, ता. ५ (वार्ताहर) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संघटन सृजन अभियानअंतर्गत नियुक्त जिल्हा निरीक्षकांनी मुरूड तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत थेट संवाद साधला. या भेटीत कार्यकर्त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि संघटन बळकटीकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निरीक्षक डॉ. रागिणी नायक, प्रदेश समन्वयक प्रदीप राव, मनीष गणोरे, महेंद्र घरत, मिलिंद पाडगावकर, राजा ठाकुर, ॲड. इस्माईल घोले, अस्लम हलडे आदी मान्यवर उपस्थित होते.
संघटन सृजन अभियानावर चर्चा करताना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच तळागाळातील नागरिकांपर्यंत काँग्रेस पक्षाचे काम प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विविध उपाययोजनांवर विचारमंथन करण्यात आले. तसेच तालुका व जिल्हा पातळीवरील संघटनेतील आवश्यक फेरबदल, कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवणे आणि आगामी काळातील पक्षाच्या धोरणांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मान्सूनपूर्व पावसानं रत्नागिरी, सिंधूदुर्गला झोडपलं; येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह हजेरी लावणार, हवामान विभागाचा इशारा

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांकडे असतो ज्ञानाचा खजिना; पण दुसऱ्यांना देतात चुकीची माहिती, यांच्यापासून रहा सावध

Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2026 : आदेश आला रे..! कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू; ठराव दाखल तारीख जाहीर

नितीन देसाई नैराश्यात होते हे माहीत असूनही इंडस्ट्रीने त्यांना मदत का केली नाही? संजय जाधव यांनी सांगितलं कारण

Ganga Dussehra: भागीरथ प्रयत्नांची ती अमर गाथा! गंगा दशहऱ्याला काशीत भाविकांचा महापूर; जाणून घ्या आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT