मुंबई

धसई चौकातील अतिक्रमणांचा वाहतुकीवर बोजा

CD

टोकावडे, ता. ५ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील ‘कॅशलेस गाव’ म्हणून ओळख असलेल्या धसई येथील मुख्य चौकात वाढलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधितांना आठ दिवसांत अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.
रा.म.मा. ६१ अंतर्गत उमरोली-धसई-पळू-दार्याघाट या प्रमुख जिल्हा मार्गावरील धसई चौकात रस्त्यालगत टपऱ्या, पत्र्याच्या शेड्स व गाळे मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले आहेत. संबंधित रस्त्याची रुंदी केवळ ५.५० मीटर असून चौकातील गोलाकार वाहतुकीच्या मार्गात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मुरबाड बांधकाम उपविभाग क्र. १ यांच्या नोटिसीनुसार, संबंधित अतिक्रमणधारकांनी आठ दिवसांच्या आत अतिक्रमण हटवून रस्त्याची जागा मोकळी करावी, असे निर्देश दिले आहेत. अन्यथा, सरकारकडून अतिक्रमण हटवून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय शासकीय नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर पुढील कारवाई करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय कोरडे यांनी नोटिसीत नमूद केले आहे. संभाव्य कारवाईमुळे धसई चौकातील वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचा धोका कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT