मुंबई

आरटीई जागांच्या तुलनेत आठपट अर्ज संख्या

CD

पनवेल, ता. ५ (बातमीदार) : आरटीईअंतर्गत २०२६-२७ या आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या ऑनलाइन लॉटरीची प्रतीक्षा आता संपणार आहे. उद्या (ता. ६) सकाळी ११ वाजता लॉटरी काढण्यात येणार आहे. जागांच्या तुलनेत अर्जाची संख्या आठ पट जास्त असल्याने प्रवेशासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेल्या हजारो पालकांचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे.

यंदा पनवेल तालुक्यात आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्चला संपली असून एकूण २२ हजार ५५२ अर्ज दाखल झाले आहेत. पनवेलमधील ११४ खासगी शाळांनी आरटीईअंतर्गत नोंदणी केली असून दोन हजार ६७६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

इंग्रजी माध्यमाच्या आणि नामांकित शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे लॉटरी प्रक्रियेत निवड होण्यासाठी पालकांमध्ये उत्सुकता आणि तणावाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांची निवड पूर्णपणे संगणकीय पद्धतीने पारदर्शक लॉटरीद्वारे केली जाणार असल्याने कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाला वाव नसल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल प्रणालीचा वापर
लॉटरी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. लॉटरीनंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी अधिकृत आरटीई पोर्टलवर जाहीर केली जाईल. तसेच पालकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारेही माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय पालकांना पोर्टलवर लॉगिन करून अर्जाची स्थिती तपासण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

Latest Marathi News Live Update : पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी मोर्चा

Mumbai News: मुंबईतील २५० अनधिकृत बांधकामांवर हातोडा, महापालिकेची धडक मोहीम

SCROLL FOR NEXT