कर्जत रेल्वे प्रश्न पेटणार
मेल गाड्यांच्या थांब्यासाठी आंदोलनाची तयारी
कर्जत, ता. ५ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यातील रेल्वे समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नागरिकांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. कर्जत शहरातील शनी मंदिर सभागृहात रविवारी (ता. ५) झालेल्या बैठकीत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत कर्जत रेल्वे स्थानकावरील प्रवासी सुविधांचा अभाव, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि कोरोना लॉकडाऊननंतर बंद करण्यात आलेल्या १७ मेल गाड्यांच्या थांब्यांचा प्रश्न यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पूर्वीप्रमाणे या सर्व मेल गाड्यांचे थांबे कर्जत स्थानकावर पुन्हा सुरू करण्यात यावेत, ही प्रमुख मागणी या वेळी करण्यात आली. कर्जतसारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्दळ असूनही आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. स्थानकावर अधिकारी व यंत्रणा असतानाही प्रवाशांना मूलभूत सोयी मिळत नसल्याने संताप वाढत आहे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. बैठकीत बोलताना ॲड. कैलास मोरे यांनी या प्रश्नांवर तोडगा न निघाल्यास व्यापक जनआंदोलन उभारले जाईल. वांगणी ते खोपोलीदरम्यानच्या विविध प्रवासी संघटनांना एकत्र घेऊन संयुक्त लढा उभारण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.