मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक
नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : उलवे परिसरातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्याला उलवे पोलिसांनी अटक केली आहे. संजय पालनकर (२३) असे त्याचे नाव असून, त्याने कामाच्या ठिकाणी ओळख वाढवून हे घृणास्पद कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. या आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याला सीबीडी बेलापूरमधील आग्रोळी गावातून अटक केली.
या प्रकरणातील आरोपी यश पालनकर हा सीबीडीतील आग्रोळी गावात राहण्यास असून, तो उलवे येथील एका नामांकित कंपनीत हाउसकीपिंग विभागात कामाला होता. आरोपीने पीडितेच्या अल्पवयीन असण्याचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली होती. याची माहिती आरोपीला समजल्यानंतर त्याने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपीच्या दहशतीमुळे पीडित मुलगी काही काळ गप्प होती. मात्र प्रकृतीतील बदलांमुळे तिने अखेर आपल्या आईला सर्व माहिती सांगितली. कुटुंबीयांनी तातडीने उलवे पोलिस ठाण्यात धाव घेतली. उलवे पोलिसांनी शुक्रवारी सीबीडी बेलापूर येथील आग्रोळी गावात सापळा रचून आरोपीला अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.