मुंबई

मैदान सुरू करण्याची मनसेची मागणी

CD

मैदान सुरू करण्याची मनसेची मागणी

मुंबई, ता. ५ : ग्रँट रोड परिसरातील महापालिकेचे मैदान मेट्रोच्या कामाच्या नावाखाली दीर्घकाळ बंद ठेवण्यात आले होते. आता मेट्रोचे काम पूर्ण होऊनही मैदान अद्याप नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. हे मैदान सुरू करावे, अशी मागणी मनसेचे उपविभाग अध्यक्ष अनिल शांताराम नागरे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
मेट्रोचे काम पूर्ण झाले असताना मैदान बंद ठेवण्यामागचे कारण काय, नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सुविधा का नाकारल्या जात आहेत, असे थेट सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. तसेच मैदानाची तत्काळ दुरुस्ती करून ते लहान मुले, युवक व ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले करण्यात यावे. परिसरात खेळासाठी पर्यायी जागा नसल्यामुळे या मैदानाचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे या ठिकाणी चित्रपट व मालिकांचे शूटिंग चालते. त्यांच्या जनरेटर व्हॅनदेखील मैदानात राखीव ठेवलेल्या असतात. कदाचित यामुळे प्रशासन नागरिकांसाठी हे मैदान खुले करीत नाही. लवकरात लवकर नागरिकांसाठी मैदान खुले करावे अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT