मुंबई

विद्या विकास विद्यालयाचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने पाऊल

CD

विद्या विकास विद्यालयाचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने पाऊल

घाटकोपर, ता. ५ (बातमीदार) : विक्रोळी येथील विद्या विकास एज्युकेशन सोसायटी संचालित विकास महाविद्यालय (प्राथमिक विभाग मराठी व इंग्रजी माध्यम) येथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारी (ता. ६) सकाळी ११.३० वाजता इंटरॲक्टिव्ह इंटेलिजंट पॅनेल बोर्डाचे उद्‍घाटन होणार आहे.
या डिजिटल उपक्रमाचे उद्‍घाटन मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्या हस्ते होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढवण्यासाठी आणि शिक्षण अधिक प्रभावी व आकर्षक बनविण्याच्या उद्देशाने हा आधुनिक पॅनेल बोर्ड शाळेत उपलब्ध करून देण्यात आला आहे. या उपक्रमासाठी डॉ. विशाल कडणे तसेच ओटीस अँड टिचमिंट टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. उद्‍घाटन सोहळ्यानंतर महामुंबई शिक्षण संस्था संघटना, मुंबई व ठाणे विभागाच्या पदाधिकाऱ्यांसोबत सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला डॉ. विशाल कडणे, मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे विश्वस्त, महामुंबई शिक्षण संस्था संघटनेचे अध्यक्ष सदानंद रावराणे यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

शाळेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, या डिजिटल उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची संधी मिळणार आहे. परिणामी, शिक्षण अधिक अनुभवाधारित, आकर्षक आणि गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT