मुंबई

९७ वर्षीय आजोबांच्या शाहीरी गाण्याने उपस्थितही भारावले

CD

९७ वर्षीय आजोबांच्या शाहिरी गाण्याने उपस्थितही भारावले

प्रभादेवी, ता. ४ : शाहिरी कलेची आवड आणि परंपरा जपत वयाच्या तब्बल ९७ व्या वर्षीही आपल्या जोशपूर्ण आवाजाने गाणे सादर करणाऱ्या आजोबांनी उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. त्यांच्या दमदार आवाजातील शाहिरी गाण्याने उपस्थितही भारावून गेले.
मुंबईतील जय हनुमान सेवा मंडळाच्या वतीने वारेली या खेडेगावात आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमात चिपळूण तालुक्यातील वारेली गावातील ९७ वर्षीय शाहीर पांडुरंग कदम या आजोबांनी आपल्या आयुष्यभर जोपासलेल्या शाहिरी कलेची झलक दाखवली.
वयाची नव्वदी ओलांडल्यानंतरही त्यांची ऊर्जा, शब्दांवरील पकड आणि ताल-लय यांचे अचूक भान पाहून उपस्थितांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. गाणे सादर करताना त्यांनी पारंपरिक शाहिरी शैलीत समाजप्रबोधनाचा संदेश देत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

‘माझी मैना गावाकडे राहिली’ या त्यांच्या गाण्याच्या सादरीकरणानंतर उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा गौरव केला. अनेकांनी त्यांच्या जिद्दीचे आणि कलेप्रती असलेल्या निष्ठेचे कौतुक केले. आजच्या तरुण पिढीनेही अशा ज्येष्ठ कलाकारांकडून प्रेरणा घेऊन लोककला जपण्याची गरज असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. तरुणपणी त्यांच्या या शाहिरी गाण्याच्या सादरीकरणावर ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांनीदेखील त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती.

या कार्यक्रमामुळे शाहिरीसारख्या पारंपरिक लोककलेचे जतन आणि संवर्धन करण्याची प्रेरणा मिळाली असून, ९७ वर्षीय आजोबांच्या या अविस्मरणीय सादरीकरणमुळे इतरांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली असल्याचे उपस्थित रसिकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT