मुंबई

एसटी बस सेवा शहरातून पूर्ववत; सकाळच्या बातमीचा परिणाम

CD

एसटी बससेवा शहरातून पूर्ववत; ‘सकाळ’च्या बातमीचा परिणाम

जव्हार, ता. ५ (बातमीदार) : जव्हार नगर परिषदेकडून शहरातील विकासकामांमुळे एसटी बस बायपास रस्त्याने वळविली होती. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात ‘सकाळ’ने शुक्रवारी (ता. ३) बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीचा परिणाम झाला असून, एसटी बससेवा शहरातून पूर्ववत करण्यात आली आहे.
दरम्यान, येथील विकासकामांमुळे पाच बत्ती, यशवंतनगर मोर्चा, भट्टीपाडा, गांधी चौक, तारपा चौक, मुकणे कॉलनी परिसरातील नागरिकांना एसटी स्टँडपर्यंत पोहोचण्यासाठी पायी चालावे लागत होते किंवा रिक्षाने जावे लागत होते. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. या समस्येबाबत ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर स्थानिक प्रशासन व एसटी विभागाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतली. नागरिकांच्या गैरसोयीचा विचार करून तातडीने उपाययोजना करीत एसटी बससेवा पुन्हा शहरातून सुरू करण्यात आली आहे.
ही बससेवा पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले असून, ‘सकाळ’ने मांडलेल्या समस्येमुळे प्रशासनाने त्वरित निर्णय घेतल्याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT