मुंबई

पाच किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यात वाढ

CD

पाच किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यात वाढ

नवी दिल्ली, ता. ५ : देशभरात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवत असून, त्यांची झळ नागरिकांना पोहोचत आहे. यामध्ये प्रामुख्याने कामगारवर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता पाच किलोच्या एलपीजी सिलिंडरचा पुरवठा वाढवण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिले. त्यामुळे स्थलांतरित कामगारांना दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार पाच किलोच्या छोट्या एलपीजी सिलिंडरची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली असून, २३ मार्चपासून आतापर्यंत सुमारे ६.६ लाख सिलिंडर विकले गेले आहेत. ४ एप्रिलला ९० हजारांहून अधिक सिलिंडरची विक्री झाली. पाच किलोचे सिलिंडर बाजारभावाने मिळतात आणि ते घेण्यासाठी पत्त्याचा अथवा कोणताही पुरावा लागत नाही. यामध्ये स्थलांतरित कामगारांना हे छोटे सिलिंडर वितरकाकडून अथवा स्थानिक दुकानातून थेट खरेदी करता येतात. त्यामुळे तातडीने गॅसची गरज असलेल्या ग्राहकांसाठी हा सोयीचा पर्याय ठरत आहे. मात्र यामधील होणारा काळाबाजार रोखण्यासाठी पाच किलोच्या एलपीजी सिलिंडरसाठी ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, देशात एलपीजी सिलिंडरचा कोणताही तुटवडा नाही. एका दिवसात ५१ लाखांहून अधिक घरगुती सिलिंडर वितरित करण्यात आले असून, ९५ टक्के बुकिंग ऑनलाइन होत असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. सोबतच साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली असून, मार्चपासून ५० हजारांहून अधिक सिलिंडर जप्त करण्यात आले; १,४०० हून अधिक नोटिसा देण्यात आल्या आणि ३६ वितरकांचे परवाने निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT