पूर्वांचल युवा संघातर्फे डॉ. नितेश सिंह यांचा सत्कार
घाटकोपर, ता. ६ (बातमीदार) : पूर्वांचल युवा संघ, पवई यांच्या वतीने रविवारी (ता. ५) सायंकाळी साकीनाका येथील तुंगा गावात युवानेते डॉ. नितेश राजहंस सिंह यांचा भव्य सत्कार करण्यात आला. मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवकपदावर त्यांच्या नियुक्तीच्या निमित्ताने हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चांदीवली विधानसभा अध्यक्ष सुरेंद्र सिंह यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान उत्तर भारतीय पारंपरिक खाद्यपदार्थ ‘लिट्टी चोखा’ तसेच लोकगीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोकगायक सुरेश शुक्ला यांनी आपल्या सुरेल गीतांनी उपस्थितांची मनं जिंकली. या सोहळ्यास मुंबई भाजपचे महामंत्री तसेच सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष व नगरसेवक हरीश भांदिरगे, श्री रामलीला महोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील दुबे, मुंबई हिंदी पत्रकार संघाचे अध्यक्ष आदित्य दुबे, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, भाजप नेते अखिलेश सिंह, उद्योजक संजय सिंह, भाजप नेते भूरा राम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच नीरज भारद्वाज, विपिन पांडे, दुर्गेश सिंह, रवि चौरसिया, आदित्य पांडे आणि इतर कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पत्रकारांशी संवाद साधताना आयोजक सुरेंद्र सिंह यांनी सांगितले की, डॉ. नितेश राजहंस सिंह यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाल्याने पूर्वांचल समाजाचा अभिमान वाढला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.