मुंबई

अँजिओग्राफीनंतर आता दाेन तासांत डिस्चार्ज शक्‍य

CD

अँजिओग्राफीनंतर आता दाेन तासांत डिस्चार्ज शक्‍य
केईएम रुग्णालयात रॅडियल लाउंज सुरू
मुंबई, ता. ६ : पालिकेच्या केईएम रुग्णालय येथील कार्डिओलॉजी विभागात रॅडियल लाउंज ही नवी सुविधा सुरू करण्यात आली असून, अँजिओग्राफी करणाऱ्या रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. या सुविधेमुळे आता बहुतांश रुग्णांची अँजिओग्राफी हाताच्या (मनगटाच्या) माध्यमातून केली जाणार असून, रुग्णालयात दीर्घकाळ दाखल राहण्याची गरज कमी होणार आहे. सर्व काही सुरळीत असल्यास रुग्णांना अवघ्या दोन ते तीन तासांत डिस्चार्ज दिला जाणार आहे.

रॅडियल लाउंजमुळे रुग्णांना मोठा फायदा होईल. तसेच एज्युकेशनल हब डॉक्टर आणि विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी उपयुक्त ठरेल, असे अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी नमूद केले.

रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, इंडियन ह्युम पाइप कंपनी लिमिटेडने सीएसआरअंतर्गत सुमारे ७५ लाख रुपयांची मदत देत हा प्रकल्प उभारला आहे. यामध्ये रॅडियल लाउंजसोबतच कार्डिओलॉजी एज्युकेशनल हब आणि ट्रेनिंग सेंटरचाही समावेश आहे.

डॉक्टरांच्या मते, अँजिओग्राफी झाल्यानंतर रुग्णांना अत्याधुनिक रिक्लायनरवर बसवून आवश्यक तेवढीच मॉनिटरिंग केली जाते. साधारण दोन तासांत रुग्णाला डिस्चार्ज देणे शक्य होते. पारंपरिक पद्धतीत पायाद्वारे अँजिओ केल्यास रुग्णाला सात ते आठ तास विश्रांती घ्यावी लागते, हालचालींवर मर्यादा येतात आणि रक्तस्त्राव टाळण्यासाठी संबंधित भागावर दीर्घकाळ दाब द्यावा लागतो. मात्र हाताद्वारे प्रक्रिया केल्यास रुग्णाची हालचाल कायम राहते आणि अस्वस्थता कमी होते. त्‍यामुळे रुग्णालयातील बेडची गरजही कमी होते आणि अधिक रुग्णांवर उपचार करणे शक्य होते.
याशिवाय रुग्णालयाला पोर्टेबल इकोकार्डिओग्राफी मशीनही उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यामुळे तपासणी प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.

कार्डिओलॉजी विभागात स्थापन करण्यात आलेले प्रो. डॉ. एच. एल. कुलकर्णी एज्युकेशनल हब आणि ट्रेनिंग सेंटर वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या केंद्राद्वारे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांशी ऑनलाइन संवाद, लाइव्ह लेक्चर्स आणि प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळणार आहे.

रुग्‍णाची परिस्‍थिती पाहून निर्णय
रुग्णाचे मूल्यमापन करून अँजिओ हाताने करायचे की पायाने, हे ठरवले जाईल. सर्व काही ठीक असल्यास दोन ते तीन तासांत डिस्चार्ज दिला जाईल, असे विभागप्रमुख डॉ. अजय महाजन यांनी सांगितले.

असे आहेत फायदे
रॅडियल पद्धतीमुळे रुग्ण लवकर चालू-फिरू शकतात. रक्तस्त्राव व गुंतागुंत होण्याचा धोका कमी असतो. रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होऊन एकाच दिवशी प्रक्रिया व डिस्चार्ज शक्य होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शेतकऱ्यांनी रोखला शिक्रापूर-पाबळ मार्ग; चासकमान कालव्याच्या अस्तरीकरणाला कडाडून विरोध, शेती आणि पाणी संकटात येईल

Latest Marathi News Live Update : पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

रंगभूमी गाजवलेला गारंबीचा बापू आता रुपेरी पडद्यावर ! पोस्टरने वेधलं लक्ष

Viral Video:"‘मी का थांबावं?’ निवृत्तीच्या प्रश्नावर हरमनप्रीतचा पलटवार; चाहत्यांना आठवला धोनीचा Viral Moment"

Panhala Fort Tourism Tax : पन्हाळा गडावर पर्यटकांची मोठी कोंडी! 15 रुपये कर देऊनही 'या' एका सुविधेसाठी करावी लागतेय कसरत; पाहा काय आहे स्थिती

SCROLL FOR NEXT