मुंबई

मनमानी फी आकारणी सहन केली जाणार नाही

CD

मनमानी शुल्क आकारणी नको!
आमदार संजय केळकर यांचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : राबोडी येथील सरस्वती शाळा आणि घोडबंदर परिसरातील युरो स्कूलमधील वाढीव शुल्काच्या मुद्द्यावर पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संजय केळकर यांनी सोमवारी (ता. ६) पालक, शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासनाची संयुक्त बैठक घेतली. सीबीएसईच्या नावाखाली मनमानी शुल्क आकारणी सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी या वेळी दिला.
शहरातील खासगी शाळांकडून करण्यात येणाऱ्या वाढीव शुल्काविरोधात पालक आक्रमक झाले आहेत. नियमांनुसार दोन वर्षांत सुमारे १५ टक्क्यांपर्यंतच शालेय शुल्काची वाढ अपेक्षित असताना काही शाळांकडून त्यापेक्षा जास्त वाढ होत असल्याचा आरोप पालकांनी केला. युरो स्कूलमध्ये दरवर्षी सुमारे आठ टक्के शुल्कवाढ केली जाते, तर सरस्वती शाळेत उशिरा शुल्क भरल्यास १,५०० रुपयांचा दंड आकारला जात असल्याची तक्रार बैठकीत मांडण्यात आली. पालक-शिक्षक संघाच्या माध्यमातून वाढीबाबत चर्चा होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अशी प्रक्रिया राबवली जात नसल्याचा आरोपही पालकांनी केला. इतर शाळांच्या तुलनेत कमी शुल्क असल्याने येथे प्रवेश घेतला, मात्र अनियंत्रित शुल्कवाढीमुळे आर्थिक ताण वाढत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
दरम्यान, या तक्रारींची दखल घेत आमदार संजय केळकर यांनी शिक्षण विभागाला स्पष्ट सूचना दिल्या. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच फी रचना असावी आणि ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त वाढ झाल्यास ती मान्य केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: ‘आधी सुरक्षित महामार्ग द्या, मगच टोल घ्या!’; कोकणवासीयांचा खारपाडा टोलनाक्यावर एल्गार, मुंबई-गोवा महामार्गावरील कामांवर संताप..

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू; अभिनेत्याने शेअर केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : जनगणना परिषद आयोजनाच्या पार्श्वभूमीवर सावता परिषदकडून नियोजन बैठकीचे आयोजन

Farmers Gold Loan : खरिपाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांवर घरातील सोनं तारण ठेवण्याची वेळ; बँकांच्या कारभाराने भ्रमनिरास, कांद्यालाही मिळेना भाव!

SCROLL FOR NEXT