फलाट क्रमांक ५ चे काम संथ गतीने
डोंबिवली, ता. ७ : मध्य रेल्वेवरील अतिशय गजबजलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसुविधांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः फलाट क्रमांक ५ वरील उंची वाढवण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
फलाट आणि रेल्वे डब्यांमधील जीवघेणे अंतर कमी करण्यासाठी फलाटाची उंची वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, हे काम दीर्घकाळापासून रेंगाळले आहे. फलाटावर सर्वत्र सिमेंट ब्लॉक न बसवल्याने पृष्ठभाग उंच-सखल झाला आहे. जलद लोकलसाठी या फलाटावर होणारी प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता, चढताना-उतरताना प्रवाशांचे पाय मुरगळण्याचे व पडण्याचे प्रकार वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी हा प्रवास सध्या धोकादायक ठरत आहे.
अस्वच्छता व अंधार
सरकत्या जिन्यांच्या कामासाठी छतावरील पत्रे काढण्यात आल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. स्थानकात स्वच्छतेचा अभाव असून, अनेक ठिकाणी प्रकाशयोजनाही अपुरी आहे.
सरकते जिने बंद
पूर्वेकडील मध्यवर्ती पुलाजवळील सरकता जिना वारंवार तांत्रिक बिघाडामुळे बंद असतो, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच वाढत्या प्रवासीसंख्येच्या तुलनेत स्वच्छतागृहांची संख्या कमी असून, तिथे अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. रेल्वे प्रशासनाने केवळ घोषणा न करता रखडलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशी आक्रमक मागणी डोंबिवलीकर प्रवाशांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.