मुंबई

नियोजित शटडाऊनमुळे वीजपुरवठा खंडित

CD

टिटवाळ्यात वीजपुरवठा खंडित
नियोजित देखभाल कामांना वेग
टिटवाळा, ता. ७ (वार्ताहर) : परिसरातील वीजग्राहकांना मंगळवारी मोठ्या प्रमाणावर वीजखंडाचा सामना करावा लागला. १००/२२ केव्ही टाटा पॉवरकडून येणाऱ्या एनआरसी १ या मुख्य वाहिनीवर नियोजित शटडाऊन घेतल्यामुळे गोवेली स्विचिंग केंद्रातून निघणारे चारही आउटगोइंग फीडर सकाळी बंद ठेवण्यात आले होते. या नियोजित कामामुळे परिसरातील वीजपुरवठा काही काळ पूर्णपणे खंडित झाला होता.

शटडाऊनच्या या कालावधीचा उपयोग करून वीज विभागाने प्रलंबित देखभाल आणि दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली. भविष्यातील तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी उच्च दाब वाहिन्यांवरील जुने व जीर्ण झालेले जंपर बदलण्यात आले. तसेच पावसाळ्यापूर्वीची खबरदारी म्हणून वीजवाहिन्यांना अडथळा ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्यांची (ट्री कटिंग) छाटणी करण्यात आली.

विविध फीडरवर स्वतंत्र कामे
मुख्य कामाव्यतिरिक्त २२ केव्ही मांडा फीडर आणि २२ केव्ही केडीएमसी फीडरवर मांडा ग्रामीण शाखेमार्फत स्वतंत्रपणे दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली होती. या कामांमुळे नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात गैरसोयीचा सामना करावा लागला असला तरी दीर्घकालीन स्थिर आणि सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ही कामे अत्यावश्यक असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात एन्ट्री; उप कर्णधाराची जबाबदारी, वैभव सूर्यवंशीही संघात...

CNG Shortage: पालघरमध्ये सीएनजीचा तीव्र तुटवडा! ३ किमी लांब वाहनांच्या रांगा, इंधनासाठी ५ तास चालक प्रतिक्षेत

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षांचा वैभव फक्त 'ऑरेंज कॅप'च नव्हे, तर ४ मोठे पुरस्कार नावावर करणार... वाचा किती लाख कमावणार?

Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

"कास्टिंग काऊचमुळे लेकीने इंडस्ट्री सोडली" अभिनेत्रीने व्यक्त केली खंत "आता जगावंसं वाटत नाही"

SCROLL FOR NEXT