पोलादपूर तालुक्यात जत्रोत्सव
हजारो भाविकांची उपस्थिती
पोलादपूर, ता. ७ (बातमीदार) ः पोलादपूर तालुक्यातील श्री वाघजाई कोंडजाई देवस्थान, देवपूर आणि अठरा गाव कोंढवी विभागाचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या उत्सवासाठी पोलादपूर, महाड, खेड, महाबळेश्वर यांसह मुंबई, पुणे आणि गुजरात येथील हजारो भाविकांनी उपस्थिती लावून देवीचे दर्शन घेतले.
श्री वाघजाई कोंडजाई देवस्थान हे बाराव्या शतकातील असून, अनेक सरदारांच्या देवपूर येथील मंदिराच्या आसपास काळ्या पाषाणात कोरलेल्या वीरगळा पाहायला मिळतात. शिवकालीन यात्रोत्सव हनुमान जयंतीनंतर साजरा केला जातो. या यात्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे कोंढवी विभागातील आठ गाव व अठरा गावातील लोक शांततेत साजरा करतात. खालू बाज्याचे विविध प्रकार पाहायला मिळतात. तसेच, बगाड लावले जाते. देवपूर येथील महाडिक घराण्यातील मानकरी यांना बगाडाला बांधून पाच वेळा गोल-गोल फिरविले जाते. हा प्रसंग अत्यंत चित्तथरारक असून, भाविक श्वास रोखून पाहतात. येथील मंदिरास आलेल्या काठ्या निशान व पालख्यांचा छबिनांचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळते.
या यात्रेला शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, सभापती अविनाश शिंदे, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, तालुकाप्रमुख नीलेश अहिरे, संपर्कप्रमुख किशोर जाधव, उद्योजक तथा अध्यक्ष किसन भोसले, राजेंद्र महाडिक, सरपंच सिद्धेश महाडिक, माजी उपसरपंच जगदीश महाडिक, अरविंद चव्हाण, उद्योजक सुरेंद्र चव्हाण, सुरेश सकपाळ, गणपत महाडिक, विठोबा महाडिक, महादेव शिंदे, सोपान पवार, नथुराम महाडिक, चंद्रकांत पवार, रमेश मोरे, डाकू भंडारे व सर्व पदाधिकारी आदींसह अनेक राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील हजारो भाविक उपस्थित होते.
ही यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी सत्यवान महाडीक अध्यक्ष कोंडजाई वाघजाई देवस्थान देवपूर, गणपत महाडीक, सोपान पवार, महादेव शिंदे, सुर्यकांत पवार, राजेंद्र महाडीक, अरविंद चव्हाण, मंगेश उपाळे, विजय पवार, निवास पवार, दामोदर महाडीक, सिद्धेश्वर महाडीक आदींनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.