मुंबई

खरीप हंगाम नियोजनासाठी कार्यशाळा

CD

खरीप हंगाम नियोजनासाठी कार्यशाळा

पालघर, ता. ७ (बातमीदार) : कोकण विभागातील खरीप हंगाम २०२६च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण सेवा मिळावी, यासाठी नियोजनबद्ध तयारी करण्याच्या उद्देशाने कोकण विभागस्तरीय खरीप हंगाम नियोजन कार्यशाळा दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले यांच्या प्रयत्नांतून व मार्गदर्शनाखाली पार पडली.

कार्यशाळेत खरीप हंगामात खते, बियाणे यांचा पुरवठा व उपलब्धता सुरळीत राहण्यासाठी ठोस नियोजन करण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच सुधारित भात बियाण्यांच्या वाणांचा वापर वाढवणे, भात बियाण्यांची बीज प्रक्रिया प्रभावीपणे राबवणे आणि कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन भात वाणांचे लागवडीखालील क्षेत्र वाढवणे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विनयकुमार आवटे (संचालक, कृषी प्रक्रिया व नियोजन, कृषी आयुक्तालय, पुणे) तसेच सुनील बोरकर (संचालक, आत्मा व कृषी निविष्टा व गुण नियंत्रण, कृषी आयुक्तालय, पुणे) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी युरिया खताच्या पुरवठ्याचे काटेकोर नियोजन करून प्रत्येक शेतकऱ्याला ते उपलब्ध होईल, याची दक्षता घ्यावी, तसेच कुठेही नियमबाह्य विक्री होऊ नये, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांच्यामार्फत सर्व कृषी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन बोरकर यांनी केले.

पालघर जिल्ह्यातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, प्रकल्प संचालक आत्मा विनायक पवार, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी यांच्यासह सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT