मुंबई

मुंब्र्यात बसच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

CD

मुंब्र्यात बसच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू
एक जण गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : मुंब्रा येथील एम. एम. व्हॅली परिसरात आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. हे तिघे एकाच दुचाकीवरून जाताना खासगी बसने त्यांना मागून धडक दिल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच दुचाकीवरून संगम राजेश पुलशरे (२१), अविनाश रामदास दवंडे (१९) आणि महेश भगवान वारे (१८) हे मुंब्रा ठाकूरपाडा, सम्राटनागर येथे राहणारे तिघे रोशनी महल येथून वाय जंक्शनकडे जात होते. त्या वेळी खासगी बसचा चालक मुस्तफा हुसेन शेख (५८, रा. रेतीबंदर) याने पाठीमागून येत दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकी त्या धडकेमुळे बसच्या पुढील चाकाखाली आल्याने ते गंभीर जखमी झाले. यामध्ये संगम पुलशरे आणि अविनाश दवंडे यांचा मृत्यू झाला, तर महेश वारे हा जखमी झाला. महेशवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT