सत्पाळा येथे ‘साहित्य जल्लोष’चे आयोजन
विरार, ता. ९ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिका (ग्रंथालय विभाग), ज्ञानदीप मंडळ, संत जोसेफ महाविद्यालय आणि साहित्य जल्लोष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २३वा ‘साहित्य जल्लोष’ कार्यक्रम येत्या रविवारी (ता. १२) जोसेफ महाविद्यालय, सत्पाळा (विरार, पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी ९ ते १० या वेळेत ‘साहित्य दिंडी’ने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, सत्पाळा नाका ते संत जोसेफ महाविद्यालय असा दिंडीचा मार्ग राहणार आहे. या दिंडीत वसई-विरार शहर महापालिकेचे उपमहापौर मार्शल लोपिस व साहित्यिक मॅक्सवेल लोपिस यांचा सहभाग असणार आहे. पहिल्या सत्रात सकाळी १०.३० ते १२ या वेळेत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. ज्येष्ठ गझलकार ॲड. डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, महापौर अजीव पाटील, चित्रपट अभिनेते अरुण नलावडे आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजेंद्र पै यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ संपादकांची मुलाखत घेण्यात येणार आहे. यात मधुकर भावे, कमलेश सुतार सहभागी होणार आहेत. या सत्राचे सूत्रसंचालन कुणाल रेगे करणार आहेत. तिसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. यात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर आणि अरुण म्हात्रे यांच्याबरोबर स्थानिक कवी सहभागी होणार आहेत. शेवटच्या सत्रात ‘अत्रे सर्वत्र’ हा कार्यक्रम सादर करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.