मुंबई

मुंबईतील अश्विनी जांबळे व प्रिशा पिल्ला यांना कांस्यपदक

CD

अश्विनी जांबळे व प्रिशा पिल्ला यांना कांस्यपदक

शिवडी, ता. ९ (बातमीदार) : महिला किकबॉक्सिंग राष्ट्रीय लीग-अस्मिता खेलो इंडिया किकबॉक्सिंग २०२६ ही स्पर्धा तमिळनाडूतील चेन्नई येथे विनायका मिशन युनिव्हर्सिटीमध्ये नुकतीच झाली. संतोष अग्रवाल यांच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील नामांकित खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यात मुंबईतील अश्विनी जांबळे आणि प्रिशा पिल्ला यांनी ‘पॉइंट फाइट’ प्रकारात उत्कृष्ट खेळ करत कांस्यपदके पटकावून महाराष्ट्राचा गौरव वाढविला. तसेच कशिश जैस्वार हिने ‘म्युझिकल फॉर्म’ प्रकारात सहभाग नोंदवत संघाच्या कामगिरीत मोलाची भूमिका बजावली.

या संपूर्ण संघाचे नेतृत्व विघ्नेश मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विशेष म्हणजे, त्यांनी या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत ‘रिंग रेफरी’ म्हणूनही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. सामन्यांदरम्यान खेळाडूंना राहुल साळुंखे यांनी तांत्रिक प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले. राष्ट्रीय स्तरावरील भव्य व्यासपीठावर आपली कौशल्ये सादर करण्याची आणि देशातील सर्वोत्तम खेळाडूंसमोर स्पर्धा करण्याची संधी मिळाल्याबद्दल, सहभागी खेळाडूंनी उमेश मुरकर यांच्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. तर या यशामुळे महाराष्ट्राच्या महिला किकबॉक्सिंग क्षेत्राला नवचैतन्य मिळाले असून, भविष्यातही राज्यातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Sangh election 2026 : 'गोकुळ'च्या निवडणुकीचा बिगुल वाजणार; १ जुलैपासून ठराव दाखल करण्याचे आदेश

Ganga Dussehra: भागीरथ प्रयत्नांची ती अमर गाथा! गंगा दशहऱ्याला काशीत भाविकांचा महापूर; जाणून घ्या आध्यात्मिक महत्त्व

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्ग : तहसीलदार देणार बिगरशेतीची माहिती, १५ दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT