मुंबई

नडगावचा प्रथमेशची ''इस्रो''ची भरारी

CD

नडगावचा प्रथमेशची ‘इस्रो’ची भरारी
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्याची अभ्यास दौऱ्यासाठी निवड
कल्याण, ता. ९ (वार्ताहर) : ठाणे जिल्हा परिषदेच्या ‘मिशन भरारी २०२५-२६’ या स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवली आहे. शहापूर तालुक्यातील नडगाव जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मधील इयत्ता सहावीचा विद्यार्थी प्रथमेश गुरुनाथ सोनावळे याने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून मोठे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल प्रथमेशची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) विशेष अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी ही परीक्षा केंद्र, तालुका आणि जिल्हा अशा तीन स्तरांवर घेण्यात आली होती. या खडतर प्रक्रियेतून प्रथमेशने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. जिल्हा स्तरावरील या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी २७ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

विमानप्रवास
दौऱ्याचे खास आकर्षण म्हणजे या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विमानाने प्रवास करून ‘इस्रो’ला भेट देण्याची संधी मिळणार आहे. अंतराळ विज्ञानाशी संबंधित माहिती थेट शास्त्रज्ञांकडून जाणून घेण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

‘मिशन भरारी’ उपक्रमाला यश
ठाणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची ओढ निर्माण करण्यासाठी ‘मिशन भरारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. २३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या परीक्षेचा निकाल लागताच नडगाव परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. प्रथमेशच्या या यशाने ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांमध्येही नवीन प्रेरणा निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेलचा भडका, एसटीच्या तिकीट दराचे काय? परिवहन मंत्री म्हणाले, महामंडळाला तोटा होतोय, सध्या...

Ambenali Accident: आंबेनळी ठरतोय मृत्यूचा घाट, ८ वर्षांपूर्वी झालेला ३३ जणांचा मृत्यू; गेल्या तीन महिन्यात तिसरी दुर्घटना

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT