मुंबई

पेणमध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू

CD

पेणमध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू
रस्तेकामांना अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई
पेण, ता. ९ (वार्ताहर) : शहराचा विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पेण नगरपालिकेने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. मुख्य रस्त्यांसह विविध ठिकाणी उभारण्यात आलेली छोटी-मोठी दुकाने, टपऱ्या आणि अन्य अनधिकृत बांधकामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच, शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांनाही या अतिक्रमणांमुळे अडथळे निर्माण होत होते.
मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाने ही कारवाई हाती घेतली असून, अंतोरा रोडवरील नरदास चाळ ते अन्नपूर्णा कॉर्नरपर्यंत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
आमदार रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून रस्ते काँक्रीटीकरणासाठी निधी उपलब्ध झाला असून, त्यानुसार शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. मात्र, अतिक्रमणांमुळे कामे रखडत असल्याने संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही अतिक्रमण न हटवलेल्यांवर पालिकेने थेट कारवाई सुरू केली आहे.

चौकट
अतिक्रमणांमुळे विकासकामांना अडथळा
शहरातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिक्रमणांमुळे रस्ते काँक्रीटीकरणासह इतर विकासकामे अडथळ्यात येत असल्याने ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decision: फ्री रेशन योजनेत ३ मोठे बदल! ८० कोटी रेशनधारकांवर थेट परिणाम होणार; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Konkan Railway: कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक जाहीर! मांडवी, तेजससह अनेक गाड्यांच्या वेळा बदलणार, काय परिणाम होणार?

“आरारारा खतरनाक…” ‘मुळशी पॅटर्न २’ लवकरच येणार, प्रवीण तरडे म्हणाले...

Latest Marathi News Live Update : उल्हासनगरात नालेसफाईचा फज्जा; काढलेली घाण पुन्हा नाल्यात

Karnataka Crisis : कर्नाटकात मोठा राजकीय भूकंप! DK शिवकुमार होणार नवे मुख्यमंत्री? लिंगायत, दलित, OBC सह अल्पसंख्याक नेत्यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ

SCROLL FOR NEXT