मुंबई

कुकशेत गावात एसआरए मीटिंगबाबत पारदर्शकतेची मागणी

CD

कुकशेत गावात एसआरए बैठकीबाबत पारदर्शकतेची मागणी

नेरूळ, ता. ९ (बातमीदार) : बेलापूर विधानसभा मतदारसंघातील कुकशेत गावामध्ये सुरू असलेल्या एसआरए (स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी) बैठक प्रक्रियेबाबत पारदर्शकता राखावी, अशी मागणी शिवसैनिक महादेव माणिकराव पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून सध्या नवी मुंबईत एसआरए बैठक अभियान राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत विविध गावांमध्ये बैठका घेतल्या जात आहेत; मात्र कुकशेत गावातील प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेत पारदर्शकता व नियमांचे पालन होणे अत्यावश्यक आहे. कुकशेत गावातील मतदार यादीतील मतदारांना योग्य माहिती दिली जात नसून, बैठकीसाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रियेबाबतही स्पष्टता नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
विशेषतः महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान मतदारांच्या हक्कांवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे पवार यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच, ज्या मतदारांची नावे यादीत नाहीत, त्यांची नोंदणी योग्य प्रकारे व्हावी, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती चौकशी करून पारदर्शकतेने एसआरए बैठक प्रक्रिया राबवावी, अन्यथा नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver : कर्जमाफी बँकाच्या वसुलीसाठी आहे का? त्रुटी दूर केल्या नाही तर पुन्हा आंदोलन करणार; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

Dapoli Mandangad Highway : दापोली-मंडणगड महामार्गाची दुरवस्था! विसापूर फाट्यापर्यंत रस्त्याची चाळण; वाहनचालकांना करावी लागतेय मोठी कसरत, पर्यटनालाही फटका

Latest Marathi News Live Update : बार्शी - सोलापूर मार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Dadar Accident: दादरमध्ये बेस्टची गाड्यांना धडक, अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Sharad Pawar: विरोधी आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू: शरद पवार, निवडणुकीपूर्वी मोठे राजकीय संकेत

SCROLL FOR NEXT