मुंबई

पाण्यासाठी ग्रामस्थांचे पुन्हा पाण्याच्या टाकीखाली आंदोलन

CD

पाण्यासाठी ग्रामस्थांचे पुन्हा पाण्याच्या टाकीखाली आंदोलन

मोखाडा, ता. ९ (बातमीदार) : मोखाड्यातील सायदे-जोगलवाडी ग्रामपंचायतीची नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी येथील नागरिकांनी पाण्याच्या टाकीखाली जनआंदोलन उभारले आहे. जोपर्यंत नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सूरू होत नाही, तोपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा ठाम निर्णय आंदोलकांनी घेतला होता. रणरणत्या उन्हात वाघ्याचीवाडी येथील पाण्याच्या टाकीखाली नागरिक व महिलांनी हंडाभर पाण्यासाठी आंदोलन छेडले. मात्र प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
केंद्र व राज्य शासनाने ‘हर घर जल’ ही संकल्पना आखत जलजीवन मिशन योजना आखली गेली. त्यादृष्टीने मोखाड्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मुख्य योजनेचे काम करण्यात आले. हे पाणी गावातील टाकीपर्यंत आणण्याची जबाबदारी प्राधिकरणाची आहे. येथील पाण्याच्या टाकीतून गावातील घराघरात पाणी पोहोचवण्याचे काम जिल्हा परिषद पाणीपुरवठाकडे सोपविण्यात आले. मात्र, निधीअभावी मोखाड्यासह पालघर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कंत्राटदारांनी ही कामे अर्धवट स्थितीत केली आहेत. त्याचा फटका मोखाड्यातील सायदे- जोगलवाडी ग्रामपंचायतीलाही बसला आहे.

दरम्यान, पालघर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत केलेल्या कामांची देयके थकल्याने, कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन केले आहे. अनेकदा शासनाला निवेदनही दिले आहेत. मात्र, निधी उपलब्ध न झाल्याने कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली आहे, तर नागरिकांना पाण्यासाठी वेठीस धरले गेले आहे.
दोन वेळेस आंदोलन करून ही त्याची दखल वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी घेतलेली नाही. उपअभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुढे आमच्या ग्रामपंचायत हद्दीत बांधलेल्या मुख्य पाण्याच्या टाकीतून तालुक्यात करण्यात येणारा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल. तसेच राज्य महामार्गावर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जोगलवाडीचे सरपंच सिंधु झुगरे यांनी दिला. तर सदरच्या नळ योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच हे काम पूर्ण करण्यासाठी येत्या आठवडाभरातच सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ललित बोरदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

PSL 2026: अपमानाचे घोट गिळत, बाबर आझम पेटला, १२ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; मेंडिसचे शतक अन् समदच्या ३३३ च्या स्ट्राईक रेटने धावा...

Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT