मुंबई

विकसित देशांकडून वाहतूक नियम शिका!

CD

विकसित देशांकडून वाहतूक नियम शिका!

रस्ते अपघाताबाबत उच्च न्यायालयाने सुनावले

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : वाहने कशी चालवावी किंवा रस्ता कसा ओलांडावा, याबाबतच्या वाहतूक नियमांविषयी भारतीय नागरिकांनी विकसित देशांकडून धडे गिरवण्याची वेळ आली आहे, असे उच्च न्यायालयाने नुकतेच सुनावले. रस्ता ओलांडताना बसच्या धडकेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांची याचिका ग्राह्य धरून त्यांना वाढीव नुकसानभरपाईचे आदेश देताना न्यायालयाने हे निरीक्षण नाेंदवले.

मृत व्यक्ती ही अंशतः पक्षाघात आणि पार्किन्सन आजाराने ग्रस्त होती. रस्ता ओलांडताना त्यांच्यासोबत कोणीतरी असणे आवश्यक होते किंवा त्यांनी तेथील उपस्थितांची मदत घ्यायला हवी होती, असे निरीक्षण न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने नोंदवले. पादचाऱ्यांनी सिग्नलचे नियम पाळून रस्ता ओलांडणे अपेक्षित आहे. या प्रकरणात अपघातासाठी थोड्याफार प्रमाणात मृत व्यक्तीची निष्काळजी कारणीभूत असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले. रस्ता ओलांडण्यासाठी लंगडत चाललेली व्यक्ती दिसूनही बसचालकाने वाहनाचा वेग कमी केला नाही. यावर बाेट ठेवून त्याची चूक असल्याचे अधोरेखित करून न्यायालयाने याचिकाकर्त्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईची रक्कम वाढवून १५ लाख रुपये देण्याचे स्पष्ट केले.
-----------
मायदेशात नियम धुडकावले जातात?
भारतीय नागरिक परदेशात गेल्यानंतर तेथील वाहतुकीच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करतात. मायदेशात नियम आणि कायदे सर्रास धुडकावले का जातात, हे अनाकलनीय आहे. नियमांचे पालन न करणे या कृतीचे समर्थन करता येणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.  दुसरीकडे, घरातील वडीलधाऱ्यांकडून अनेकदा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होते. परिणामी, घरातील मुलेही त्यांचे अनुकरण करतात. म्हणूनच वाहन चालवताना आणि रस्ता ओलांडताना नियमांचे पालन करणे, हे वडीलधाऱ्यांचे आणि पालकांचे नैतिक कर्तव्य असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
-------
प्रकरण काय? 
मृत्युमुखी पडलेली व्यक्ती पार्किन्सन आणि अंशतः पक्षाघाताने ग्रस्त होती. नोव्हेंबर २०१२मध्ये रस्ता ओलांडताना ठाणे महानगर परिवहनच्या (टीएमटी) बसने त्यांना धडक दिली. त्यानंतर मार्च २०१३मध्ये त्यांचा मृत्यू झाला. मोटार अपघात दावा लवादाने याचिकाकर्त्यांना १३ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली. नुकसानभरपाईची रक्कम वाढवून मिळावी, या मागणीसाठी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

PSL 2026: अपमानाचे घोट गिळत, बाबर आझम पेटला, १२ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; मेंडिसचे शतक अन् समदच्या ३३३ च्या स्ट्राईक रेटने धावा...

Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT