मुंबई

वसईच्या रस्त्यांवर धुळीचे साम्रज्य

CD

वसईच्या रस्त्यांवर धुळीचे साम्रज्य
संथ गतीने सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागरिक त्रस्त

विरार, ता. १० (बातमीदार) : वसई-विरार शहरात सध्या जागोजागी जलवाहिन्या टाकण्यासाठी तसेच गटाराच्या दुरुतीसाठी खोदकाम करण्यात आले आहे. पण, बांधकाम साहित्याचा वाढलेला खर्च, मजुरांची कमतरता अशा विविध कारणांमुळे ही कामे संथ गतीने सुरू असून, खोदलेल्या रस्त्यांमुळे शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

वसई-विरार महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी विविध ठिकाणी खोदकाम करून जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, तर दुसरीकडे पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये यासाठी गटारबांधणी, गटारांचे रुंदीकरण यासाठी रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे. शहरातील मुख्य आणि जोडरस्ते खोदण्यात आले असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते उंचसखल झाले असून, पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याची भीती वाढली आहे. तर याच रस्त्यांवर वाढलेल्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे उडणाऱ्या धुळीचा सर्वाधिक फटका रिक्षाचालक आणि दुचाकीस्वारांना बसत आहे.

तसेच ओबडधोबड रस्त्यांमुळे माणिकपूर, बंगली नाकासारख्या अरुंद रस्त्यांवर वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे. तर वाहनांच्या या धीम्या वाहतुकीमुळे सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास होणाऱ्या वाहतूक कोंडीत मोठी वाढ झाली आहे. रस्त्याच्या शेजारील पदपथसुद्धा आता धुळीने माखत असल्यामुळे पादचाऱ्यांना पदपथांवरून चालणे कठीण झाल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahatma Phule: जन्म द्विशताब्दी वर्षातच फुलेंच्या विचार साहित्याचा शासनाला विसर! शासकीय ग्रंथागारात पुस्तकं उपलब्धच नाहीत; फुले साहित्यप्रेमींचा आंदोलनाचा इशारा

Kumbh Mela Viral Girl Monalisa: मोनालिसा अल्पवयीन असल्याचं तपासात उघड, फरमान खानवर 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा; कुंभमेळ्यात झाली होती व्हायरल

Mumbai News: मेट्रो-१० ला गती; पॉड टॅक्सीचा प्लॅन तयार! मुंबईनंतर 'या' तीन शहरांमध्ये पॉड टॅक्सी सुरू होणार, सरकारचा मोठा निर्णय

Israel Reaction Ceasefire : पुन्हा युद्धाची ठिणगी पडणार! अमेरिका–इराण युद्धविरामावर इस्रायलची तीव्र नाराजी; पाकिस्तानची मध्यस्थी अमान्य, काय आहे इतिहास

Sara Tendulkar Viral Video : कोणाला सपोर्ट करणार, लखनौ की गुजरात? सारा तेंडुलकर गोड हसली अन् तिची प्राईजलेस रिअ‍ॅक्शन, Video

SCROLL FOR NEXT