

Chris Gayle on Vaibhav Sooryavanshi | SRH vs RR | IPL 2026
Sakal
मुल्लनपूरच्या मैदानात बुधवारी १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचे (Vaibhav Sooryavanshi) वादळ घोंगावलं. आयपीएल २०२६ स्पर्धेत बुधवारी मुल्लनपूरमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) संघात खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने ४७ धावांनी विजय मिळवत क्वालिफायर २ (Qualifier 2) सामन्यात प्रवेश केला.
राजस्थानच्या (Rajasthan Royals) विजयात वैभवचा वाटा मोठा होता. त्याने या सामन्यात आक्रमक खेळ करत संघाला मोठी धावसंख्येपर्यंत पोहचवले होते. यादरम्यान त्याने अनेक विक्रम मोडले.