मुंबई

विक्रमगड तहसील कार्यालयावर मोर्चा

CD

विक्रमगड तहसील कार्यालयावर मोर्चा
प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाला जाब

विक्रमगड, ता. १० (बातमीदार) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विक्रमगड तालुक्यातील विविध शासकीय विभागांकडून जनतेच्या समस्या दीर्घकाळ प्रलंबित ठेवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे प्रशासनाला थेट जाब विचारत विविध प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.

तालुक्यातील विविध गावांमधून मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र येत घोषणाबाजी करत तहसील कार्यालयाकडे रवाना झाले. प्रलंबित प्रश्न सोडवा, शासन जागे व्हा अशा जोरदार घोषणा देत वातावरण दणाणून गेले होते. या मोर्चामध्ये मनसेच्या वतीने अनेक महत्त्वाच्या मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. त्यामध्ये विक्रमगड-तलवाडा मार्गासह तालुक्यातील इतर खराब रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करणे, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे त्वरित सुरू करणे, घरकुल योजनेतील कथित घोटाळ्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणे, नागरिकांना येणाऱ्या जादा वीजबिलांवर नियंत्रण आणणे, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा सुरळीत करणे, जलजीवन योजना पूर्ण करणे तसेच वनपट्टे वितरणाची प्रक्रिया गतिमान करणे यांचा समावेश होता. याशिवाय स्थानिक पातळीवरील विविध लहान-मोठ्या प्रश्नांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

या मोर्चाचे नेतृत्व मनसेचे विक्रमगड तालुका अध्यक्ष योगेश पाटील यांनी केले. या वेळी पालघर लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्ष भावेश चुरी, जिल्हा सचिव सतीश जाधव यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाशी चर्चा करत नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी ठामपणे मांडली.
दरम्यान, तहसील कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी मनसेच्या प्रतिनिधींशी चर्चा करून सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल व लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी दिला. या मोर्चामुळे तालुक्यातील प्रलंबित प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून, प्रशासन यावर कितपत गांभीर्याने कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs RCB Live : Proud Of You... मजुराच्या पोरानं बंगळुरूला दिले धक्के, दिग्गजांना बाद केले अन् ९४ धावांत ६ फलंदाज तंबूत पाठवले

Mumbai News : जीवा शिवाचं नातं उलगडणाऱ्या 'निळाई'तील कविता आत्मशोधाचा प्रवास दाखवतात; ज्येष्ठ कवयित्री डॉ. मिनाक्षी पाटील यांचे गौरवोद्गगार

RR vs RCB Live : रियान परागला दुर्बुद्धि सुचली अन् विराट कोहलीला 'Golden Duck'वर माघारी पाठवण्याची संधी हुकली, जोफ्रा आर्चर संतापला, पण रवी बिश्नोईने 'दांडा' उडवला

Mumbai News : खाडी तणावातही मुंबईची गती कायम! गॅस टंचाईच्या भीतीला छेद; मेल-एक्सप्रेस प्रवाशांत दीड टक्के वाढ!

Who is Brijesh Sharma? मजुराचा मुलगा, बूट घेण्याचेही नव्हते पैसे अन् आज विराट कोहलीची विकेट घेण्यासाठी झालाय सज्ज...

SCROLL FOR NEXT