मुंबई

लग्नाचे आमिष, सक्तीचा गर्भपात आणि छळ, प्रियकराच्या जाचाला कंटाळून घणसोलीत विवाहितेची आत्महत्या

CD

जाचाला कंटाळून
विवाहितेची आत्महत्या
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला अटक

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : लग्नाच्या भूलथापा देऊन एका विवाहितेचा छळ केल्याची धक्कादायक घटना घणसोलीत घडली. या जाचाला कंटाळून विवाहितेने मंगळवारी (ता. ७) राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेतील आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला गुरुवारी (ता. ९) अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट, वैद्यकीय कागदपत्रे आणि काही कपड्यांचे तुकडे जप्त केले असून घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
ऐरोली येथे राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाने घणसोलीत राहणाऱ्या ३१ वर्षीय विवाहितेला लग्नाच्या भूलथापा देऊन तिला पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले. त्यानंतर या विवाहितेसोबत लग्न करण्यास नकार देऊन तिचा छळ केल्याने या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अजय संतोष तेली (२४) असे या तरुणाचे नाव असून रबाळे पोलिसांनी त्याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
आरोपी अजय याने सहा महिन्यांपूर्वी विवाहितेशी जवळीक साधून तिला लग्नाच्या भूलथापा दिल्या. त्यानंतर त्याने या विवाहितेला तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले; मात्र घटस्फोटानंतर जेव्हा लग्नाची वेळ आली, तेव्हा त्याने या विवाहितेसोबत लग्न करण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
या कालावधीत आरोपी अजय सतत संशय घेऊन पीडितेशी भांडण करत होता. तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. पीडिता गरोदर असताना तिच्या इच्छेविरुद्ध तिला गर्भपात करण्यास भागही पाडले. अजयकडून मिळणाऱ्या या सततच्या त्रासाला कंटाळून या विवाहितेने मंगळवारी (ता. ७) सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर मृत विवाहितेच्या कुटुंबीयांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Onion Crop : कांदा उत्पादकांचा प्रश्न निकाली निघणार? देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात केलं बैठकीचं आयोजन; विरोधकांवरही टीका

LPG Alternative India : महाग 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली स्वस्त आणि पर्यावरणपूरक इथेनॉल शेगडी

Everest Base Camp: दादांची शिकवण अन् लेकीची जिद्द; नयना बोऱ्हाडे यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दमदार कामगिरी

Latest Marathi News Live Update : बीडमधील गेवराई शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घर जळून खाक

पंतप्रधान मोदींची 12 वर्षे पूर्ण! फडणवीस-चव्हाणांनी मांडला विकास आणि राष्ट्रनिर्मितीचा लेखाजोखा; ‘नव्या भारताची’ दिशा सांगितली

SCROLL FOR NEXT