

Devendra Fadnavis Onion Crop farmers
esakal
onion export Maharashtra : राज्यात डिझेल टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील असल्याचे स्पष्ट केले. कांद्याच्या खरेदीदरात वाढ करून तो १५ रुपयांपर्यंत नेण्यात आल्याची माहिती देत, केंद्र सरकारसोबत कायमस्वरूपी उपाययोजनांवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत उद्या २७ मे रोजी बैठक होणार आहे. विरोधकांच्या आंदोलनावर टीका करताना “कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात पाणी येत नाही, ती मंडळी अश्रू ढाळत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.